जळगाव । शिरपूर तालुका पोलीसात मोटारसायकल हरविल्याची नोंद असलेली मोटारसायकल चोपडा शहरात काही तरूण वापरत असल्याचे माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना संशयितरित्या ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक चौकशी केली असता यात एक आरोपी ही टीव्ही प्रेस रिपोर्टर असल्याचे समोर आले असून पुढील चौकशी साठी दोन्ही आरोपीना शिरपूर पोलीसांच्या चौकशीसाठी ताब्यात देण्यात आले आहे. संशयीत आरोपी योगेश मुरलीधर बैरागी (वय-29) रा. पंकज नगर स्टॉप, तुषार अॅटो गॅरेज मागे चोपडा, मनोज शालिक सोनवणे (वय-30) रा. वाल्मिक नगर, चोपडा असे दोघी आरोपींची नावे आहे.