जळगाव। चोपडा आडावत रोडवरील माचला फाटा येथे मोटार सायकलवरुन जाणार्या एका व्यक्तीच्या हलचाली संशायस्प वाटल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने पोलिसांनी खाक्या दाखवताच सदरील मोटार सायकल चोरीची असल्याने कबुल करत त्याच्यासह तर दुसर्या घटनेत पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार पथकाने भुसावळ बसस्थानकाबाहेर सापळा रचुन दुसर्या व्यक्तीला त्याचा ताब्यातील मोटार सायकल चोरीचे असल्याचे त्यानेही कबुल केले. या दोन्ही घटनेमुळे चोरट्यांच्या पायखालची वाळू सरकली आहे. त्यांच्याकडून तब्बल 15 मोटार सायकली जप्तकरुन आरोपिंना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार जिल्ह्यात वारंवार मोटार सायकल चोरीचे गुन्हे होत असल्याचे तक्रारी पोलिसांकडे आले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक दत्तत्रय कराळे यांच्या मार्गदर्शना खाली स्थानीक गुन्हे शाखा यांच्या पथकातील पोलिस कर्मचार्यांनी आज दुपारी चोपडा-अडावत रोडवरील माचला फाटा येथे प्रविण लोटण कोळी (रा.सुटकार ता. चोपडा ह.मु.माचला) याच्या कब्जातील एक हिरोहोंडा फॅशन प्रो कंपनीची मोटार सायकल बाबत विचार पुस केली असता.
सदर मोटार सायकल चोपडा शहरातून पंकज नगर स्टॉप मागिल कॉलनीतुन चोरी केल्याबाबत कबुली दिली. अधिक विचारना केली असता. अमळनेर शहरातुन व चोपडा शहरातुन अशा एकून 4 मोटार सायकली पोलिसांनी हस्तगत केल्या. याबाबत चोपडा शहर पोलिसात आरोपी प्रविण कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व गाड्या केल्या जप्त
दुसर्या घटनेत गुप्त माहितीनुसार भुसावळ बसस्थानकासोमोर शेख नासिर शेख मुक्तार (रा. मुक्ताई नगर) याच्या कडील मोटार सायकल ताब्यात घेऊन त्याची विचारपुस केली असता सदरील मोटार सायकल ही चोरीची असल्याचे कबुली देत साथिदार शेख ईम्रारान शेख इसा (रा. मनियार वाडा) याने आडावद, वरणगाव या भागात मोटारसायकल चोरल्याचे कबुल केले. तसेच शेख नासिर शेख मुक्तार याला पोलिसांनी विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता शेख ईम्रारान शेख इसा याने मुक्ताईनगर तालुक्यातुन निमखेडी, कुर्हा, अंतुरली, इदगाव रोड, पाचोरा बसस्थानक येथुन प्रत्येकी एक तर शहापुर, बर्हाणपुर (म.प्र.) येथुन चार असे एकून 11 मोटारसायकली चोरी केल्याचे कबुली दिल्याने. यांच्या विरुद्धात वरणगाव, मुक्ताईनगर व भुसावळ पोलिसातील गुन्हे उघडकीस आले.