जळगाव । महामार्गावरील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ अचानक टायर फुटून नियंत्रण सुटल्याने तहसिलदारांच्या वाहनाने समोरून येणार्या मोटारसायकलस्वाराला जोरदार धडक दिली होती. या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला. याप्रकरणी जखमी युवकाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात रावेर तहसिलदार यांच्या वाहनावरील चालक अरविंद बोरसे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी घडली होती घटना
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रावेर तहसिलदार हे चालक अरविंद जगन्नाथ बोरसे यांच्यासह (एमएच 19 एम 0558) ने रावेरकडे जात असतांना रात्री 8.30 वाजेच्या सुमारास महामार्गावरील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ त्यांच्या बोलेरो वाहनाचे टायर अचानक फुटल्याने वाहनावरील सुटले होते. त्यामुळे बोलेरो कार समोरून येणार्या एमएच 19 सीडी 338 क्रमांकाच्या मोटारसायकलीवर धडकली होती.या अपघातात मोटारसायकलवरील दर्शन भास्कर काळे वय 36 रा. विठ्ठलपेठ हे जखमी झाले होते. याप्रकरणी जखमी दर्शन यांचा भाऊ स्वप्नील अनिल बोंडे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात बोलेरो कारचालक अरविंद जगन्नाथ बोरसे रा. एरंडोल यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जखमी दर्शनची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. तहसिलदार रांचे वाहनावरील चालकाविरुद्ध औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.