पिंपरी : मोटार धडकेत एका तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (दि.2) सकाळी साडेअकरा वाजता घडली. अक्षदा तुकाराम राठोड (वय 3, रा. रामदासनगर, चिखली) असे मयत मुलीचे नाव असून तिचे काका हिरु राठोड (वय 21 रा. चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षता ही तिच्या घराजवळ खेळत होती. मात्र खेळता- खेळता ती अचानक गाडीच्या समोर आल्याने तिला कारची जोरदाऱ धडक बसली. यामध्ये ती गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.