मोटार सायकल चोरी सुरूच; पोलिसांपुढे मोठे आव्हान

0

शहादा । शहरात मोटरसायकल चोरीचे सत्र सुरुच असून पोलीसापुढे मोठे हे एक आव्हान आहे. शहादे शहरात आठवडे भरात डझनभर पेक्षा जास्त दुचाकी चोरीचा घटना घडल्या असुन ह्या घटनानमध्ये वाढच होत आहे. ह्याबाबत पोलीसात तक्रारी दाखल करुनही पोलीसांच्या तपासाला प्रश्‍नचिन्ह उभे रहात असल्याने मोटार सायकल धारकामध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. शहादा शहर हे गुजरात व मध्यप्रदेशाला चोरीला जात असून आठवडे भरात डझन भरापेक्षा जास्त दिवसा ढवळ्या सराईतपणे मोटरसायकलीची चोरी होत आहे, तर रात्रीचा सुमारास घराचा कंपाऊंड मधुन मोटार सायकली चोरुन नेत आहेत. मोटरसायकली चोरी जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर नवीन वसाहतीतुन होत आहे. कारण नवीन वसाहतीत घरांचा संख्या मर्यादीत व शहरापासून लांब अंतरावर असतात. त्यामुळे रात्रीचा वेळी वसाहतीत साम सुम लवकर होते त्याचाच फायदा घेत चोरटे चोरी करतात. यासाठी पोलीसांची गस्त वाढविण्याची आवश्यकत आहे. मोटारसायकली चोरी करणारे सराइत गुन्हेगार असून आंतरराज्यीय टोळी असल्यानेच मोटारसायकली मोठ्या प्रमाणावर चोरीला जात आहे.

पोलीसांचा तपासावर वाहन धारकांचे प्रश्‍नचिन्ह
चोरी करणारी टोळी असल्यांने व जवळच गुजरात व मध्यप्रदेश राज्य असल्याने लागलीच मोटर सायकलीची तोड फोड करुन वेगवेगळे स्पेअर पार्ट केले जात असावे अशी चर्चा नागरीकामध्ये होताना दिसते. महत्वाचे असे की शहराचा सीमेवर पोलीस चौकी तैनात आहे परंतु ती नावालाच आहे की काय अश्या बाबतची शंका निर्माण व्हायला लागली आहे. ड्युटीवर असलेल्या पोलीसांनी लक्ष घातले तर नक्कीच यावर आळा बसेल. यापूर्वीही अनेक मोटर सायकल चोरीचा तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत . नुकतीच युनियन बँक समोरुन एका शिक्षकाची मोटर सायकल चोरीला गेली याबाबत पोलीसात दाखल झाली आहे.मात्र पोलीसांचा तपासावर वाहन धारकांचे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असुन नागरीकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे असेच सातत्याने चालु राहिल्यास नागरीकांचा पोलीसावरील विश्‍वास उडणार आहे