मुंबई: गावाच्या विकासात सरपंचांची भूमिका मोठी असते. गावाच्या विकासावर राज्याचा विकास अवलंबून असल्याने ग्रामविकास मंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. दर तीन महिन्याला तालुकास्तरावर सरपंच समितीची बैठक घेण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. दर तीन महिन्याला सरपंच समितीची बैठक घेऊन त्यात गावातील विकासात्मक कामे आणि अडीअडचणीवर चर्चा होणार आहे. नुकत्याच राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या आहेत. सरपंच पदाच्या निवडणुका सुरु झाल्या आहेत. लवकरच गावाचा कारभारी ठरणार आहे. ग्रामपंचायतींना अधिक सक्षम करण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून मोठ्या प्रमाणात निधी दिले जात आहे. नुकतेच १५ व्या वित्त आयोगातून १४५६ कोटींचा निधी १५ व्या वित्त आयोगातून मंजूर झाला आहे.