मोठी राजकीय बातमी: फडणवीस-संजय राऊत यांची गुप्त भेट

0

मुंबई: महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलला गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघांनी सोबत जेवण घेत दोन तास चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

राऊत यांनी फडणवीसांवर नेहमीच तोंडसुख घेतले आहे. टोकाचा विरोध केला आहे, त्यानंतर आज दोघांची भेट झाल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. राजकारणात काही उलथापालथ होऊ शकते का याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना आणि भाजपची जुनी मैत्री होती मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर दोघांमध्ये मतभेद झाल्याने युती तुटली.