मोठ्या प्रमाणात गुलाल खरेदी करणारी मंडळे कळवा

0

तळोदा । शहरात गणेशोत्सव सुरू झाला आहे. हा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीसांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. यासाठी शांतता कमिटीची बैठक बोलवून आवाहन करणे यात काही गैर नाही. परंतु, गणेश उत्सव शांततेत पार पडावायासाठी शहरातील गुलाल विक्रेत्यांची बैठक तळोदा पोलीस स्थानकात पोलीस निरिक्षक मिलींद वाघमारे यांनी घेतांना विचित्र सूचना या व्यापार्‍यांना करून त्यांच्या संभ्रम निर्माण केला आहे. या बैठकीत कोणत्या गणेश मंडळाने गुलालाची जास्त प्रमाणात खरेदी आहे त्या मंडळाचे नाव पोलीसांना कळवावे असे सूचित करण्यात आहे. तसेच पन्नास थैली गुलाल किंवा त्यापेक्षा जास्त गुलाल विकत घेणार्‍या इसमाचे नाव पोलीसांना कळवावे असेही सांगितले. विक्रेत्यांनी गुलाला विक्रीकरतांना पक्की पावती द्यावी, गुलालाचा दर्जा चांगला ठेवा, रांगोळी मिस्त्रीत गुलाल विक्री करून नये असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले आहे.

पोलीसांचा द्रविडीय प्राणायाम
या बैठकीला 10 ते 15 व्यापारी उपस्थित होते. अश्या सूचनांमुळे खरोखरच गणेश उत्सव शांततेच पार पडतील का? उसत्व शांतते पार पडण्यासाठी केवळ गुलाल हा मुद्दा होवू शकत नाही तर त्या सोबत इतरबाबी सुध्दा कारणीभूत असतात त्यांच्या ही विचार होणे आवश्यक आहे. गणेश उत्सव सुरू होण्यापूर्वी जर तालुक्यात राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे ,अवैध दारू विक्री आदी बंद केले असते तर अनेक कुंटूबाचा संसार उध्वस्त होण्यापासून वाचलाच असता. जनमाणसात पोलिसांची प्रतिमा उचंविणात मदत झाली असती. ज्यानीं कायदेशीररित्या आपली किराणा दुकाने थाटली आहेत. त्यातील काही दुकानदार शासनाचे विविध कर भरणारे व्यापारी आहेत. त्या व्यापार्‍यांना पोलीस स्टेशन मध्ये बोलून त्याचीं बैठक घेण्याची आवश्यकता कदाचित राहिली नसती.