पाळधी । श्रीराम ज्येष्ठ नागरिक मंडळाचे कार्य संपुर्ण जिल्ह्यात सुरू असून त्यांचे कार्य तरूणांना प्रेरणा देणारे आहे. या मंडळाच्या कार्यास माझा मानाचा मुजरा असे प्रतिपादन पं.स.सदस्य मुकुंद नन्नवरे यांनी आयोजित मोतीबिंदू शिबीरात केले. व्यासपीठवर अध्यक्ष म्हणून हास्य कलाकार राजेंद्र पाटील होते सोबत मंडळाचे अध्यक्ष शरदचंद्र कासद, उपाध्यक्ष मदनलाल झवर, साहेबराव पाटील, डॉ.व्ही. आर.पाटील, सुचित्रा महाजन हे होते. सुत्रसंचालन आधार गुरूजी यांनी केले. कार्यक्रमात राजेंद्र पाटील यांनी वासूदेव आला व नाना पाटेकर यांचे हुबेहुब अभिनय करून दाखविले.
जळगावच्या डॉक्टरांनी केली तपासणी
मोतीबिंदू शिबीरात 150 रूग्णाची नेत्रतपासणी करण्यात येऊन 38 रूग्णांना कांताई नेत्रालय जळगाव येथे मोफत मोतीबिंदू शास्त्रक्रिया करण्यात येणार आहे. श्री चामुंडा माती होमीओपॅथी मेडीकल कॉलेज जळगावच्या डॉक्टरांनी 60 रूग्णांची तपासणी करून त्यांना माफत औषधोपचार केला. शिबीराच्या यशस्वितेसाठी आधार गुरूजी, पंढरीनाथ ठाकूर, साहेबराव पाटील, डॉ.बिचवे गोरखदादा, सफदरखॉ पठाण, श्री.सोनार, गोकुळ फुलपगार, श्री.सोनवणे, देवराम पाटील, दिनेश जोशी, सुभाष पाटील यांनी परीश्रम घेतले. सुचित्रा महाजन यांचेकडून मुलाच्या वाढदिवसानिमित्त फराळ व चहा देण्यात आला.