नवी दिल्ली: संपूर्ण जग कोरोना या महामारीच्या संकटात सापडले आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला. संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. तीन वेळा लॉकडाऊन वाढवण्यात आल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून चौथ्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. 18 में नंतर चौथ्या लॉकडाऊनला सुरू होणार असून त्यापूर्वी चौथ्या लॉकडाऊनच्या अटी शर्थींची माहिती दिली जाईल अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. चौथा लॉकडाऊन नियमानुसार होणार असून ती नियमावली 18 में नंतर समोर येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. 20 लाख कोटींच्या पॅकेजमुळे देशातील उद्योग क्षेत्रासह सर्वच क्षेत्राला दिलासा मिळणार आहे.