मोदींचा हत्येचा कट ही भाजपने पसरविलेली अफवा

0

मुंबई – पुणे पोलिसांनी माओवाद्यांचा खासगी संवाद पकडला असून त्यात पंतप्रधान मोदी यांची राजीव गांधीप्रमाणे हत्या करण्याबाबत चर्चा करण्यात आल्याचे उघड झाले आहे. काँग्रेस खासदार संजय निरुपम यांनी मात्र पंतप्रधान मोदींच्या हत्येची बातमी जाणिवपूर्वक पेरली असल्याचे म्हटले आहे.

“मी असे म्हटत नाही की हे पूर्णपणे खोटे आहे. परंतु ही पंतप्रधान मोदींची जुनी युक्ती आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही त्यांनी हेच केले. जेव्हा जेव्हा त्यांची लोकप्रियता कमी होते, तेव्हा तेव्हा त्यांच्या हत्येच्या कटाची बातमी पसरवली जाते. त्यामुळे यावेळी सत्यता तपासली पाहिजे”, असे निरुपम म्हणाले. दरम्यान, या प्रकरणात न्यायालयाने लक्ष घालावे अशी मागणी माकपचे सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी केली आहे. “आपल्या देशात सुरक्षा दले आणि न्यायालये आहेत. ते याकडे पाहतील. सुरक्षा दले भारतातील राजकारण्यांची काळजी घेत आहेत. न्यायालयाला याबाबत निर्णय देऊ दे,” असे येचुरी म्हणाले.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी अटक केलेल्या ५ पैकी एका व्यक्तीच्या घरून पत्र जप्त केले आहे. त्यावरून पंतप्रधान मोदी यांची राजीव गांधींप्रमाणे हत्या करण्याचा त्यांचा कट समोर आला.