नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सुमारे 96 तासांच्या 33 तास विमानात काढून कमी वेळेत तीन देशांचा दौरा पूर्ण केला आहे. बुधवारी ते मायदेशी परतले. विशेष म्हणजे या दौर्यात मोदींनी 33 कार्यक्रम आणि बैठकांमध्ये सहभाग घेत त्यांच्या कार्यशैलीची झलक दाखवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 जूनरोजी पोर्तुगाल, अमेरिका व नेदरलँड्स या तीन देशांच्या दौर्यावर रवाना झाले होते. अमेरिकेत मोदींनी 20 कंपन्यांच्या मुख्याधिकार्यांसोबत चर्चा केली.
डचकडून सायकल भेट
नेदरलँडच्या दौर्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुट्ट यांनी चक्क सायकल भेट म्हणून दिली आहे. मोदी यांनी सायकर भेटीचे छायाचित्रे ट्विटरवर शेअर केले आहेत. त्यात मोदी सायकलवर बसून हसताना दिसत आहेत. तर रुट्ट मोदींच्या बाजूला उभारून हसत आहेत.
नेदरलँडचे पंतप्रधानांचे ट्विट ठरले हिट
नेदरलँण्डमध्ये आपले स्वागत आहे. भारत आणि नेदरलँण्डचे 70 वर्षाचे राजनयिक संबंध असून आपल्या भेटीसाठी मी उत्सुक आहे, असे ट्विट नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुट्ट यांनी केले असून ते कमालिचे (व्हायरल) हिट ठरले आहे. तब्बल पाच हजार जणांनी हे ट्विट रिट्विट केले असून 11 हजाराहून जास्त जणांनी हे ट्विट लाईक केले आहे.