इंदूर: पंजाब सरकारचे मंत्री तथा माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना नवऱ्या नवरीशी केली आहे, मोदींचे काम नव्या नवरीसारखे असून काम कमी पण बांगड्यांचा आवाज जास्त, असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या सहाव्या टप्प्याचे मतदान उद्या रविवारी होत असून, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सिद्धू यांनी इंदूर येथे हे विधान केले आहे.
भाजपच्या सरकारला सत्तेतून हद्दपार करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. आतापर्यंत हिरो नंबर १, कुली नंबर १, बिवी नंबर १, असे चित्रपट पाहण्यात आले होते, पण आता एक नवा चित्रपट येत असून त्याच नाव ‘फेकू नंबर १’ आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.