मोदींचे नीती आयोगातील भाषण अर्धसत्य

0

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नीती आयोगातील भाषण अर्धसत्य, लांबलचक गोष्टी व कुतर्क असलेले होते, असे आरोप काँग्रेस पक्षाने केले आहे. हेच अच्छे दिन का? असा सवालही काँग्रेसने केला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे गुलाबी चित्र पंतप्रधानांनी मांडल्याचा आरोप काँग्रेसचे संपर्क प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. पंतप्रधानांनी २०१४ मध्ये जीडीपीचा प्रयोग कमी करण्याचे आश्वासन दिले होते का? अशी खोचक टीका सुरजेवाला यांनी केली.

युवकांसाठी दोन कोटी नोकऱ्या निर्माण करणार असल्याचे पंतप्रधानांचे आश्वासन म्हणजे ‘महा जुमला’ होय. पंतप्रधानांचे भाषण अर्धसत्य, लांबलचक गोष्टी व खोटेपणाचे आहे, असे सुर्जेवाला यांनी सांगितले. मोदीजी तिमाही जीडीपीच्या वाढीच्या गोष्टी सांगतात, परंतु यावर्षीदेखील जीडीपी केवळ ६.७ आहे हे विसरतात, अशी टीका सुरजेवाला यांनी केली.