मोदींच्या अहंकाराला देश माफ करणार नाही: प्रियांका गांधी

0

नवी दिल्ली: कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी आज हरियानातील अंबाला येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी मोठे अहंकारी असून त्यांचा अहंकाराला देश कधीही माफ करणार नाही. ज्या-ज्या वेळी अहंकार वाढले आहे, त्यावेळी सर्वनाश हा निश्चित असतो अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली. यावेळी प्रियांका गांधी यांनी महाभारताचे उदाहरण दिले. दुर्योधन मोठे अहंकारी होते, त्यांना इतका अहंकार आला की त्यांनी भगवान श्रीकृष्ण यांना देखील कैद करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.

भाजप हे निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढत नसल्याचे आरोप प्रियांका गांधीनी केले. पाच वर्षात विकास केलाच नाही तर जनतेला काय सांगणार. विकासाचे मुद्दे नसल्याने कधी शहीद जवान तर कधी माझ्या कुटुंबातील शहीद सदस्यांच्या नावाने मत मागत असल्याचे आरोप प्रियांका गांधीने केले.