मोदींच्या बायोपिकवरून ओमर अब्दुलांनी घेतली फिरकी

0

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. या चित्रपटाच्या पहिला पोस्टर रिलीझ झाला आहे. या चित्रपटात विवेक ओबेरॉय प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. विवेकच्या नावाची घोषणा झाल्यापासून अनेकांनी त्याची खिल्ली उडवली आता विवेकच्या निवडीवरून जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मोदींची आणि विवेकची फिरकी घेतली आहे.

‘डॉक्टर मनमोहन सिंग यांची भूमिका करण्यासाठी अनुपम खेर सारख्या उत्तम अभिनेत्याची निवड होते, पण बिच्चाऱ्या मोदींना मात्र आपल्या जीवनपटासाठी विवेक ओबेरॉय सारख्या अभिनेत्यावर समाधान मानावं लागत आहे त्यापेक्षा सलमानची निवड झाली असती तर खरी मज्जा आली असती’ असं उपहासात्मक ट्विट करत ओमर यांनी मोदींची फिरकी घेतली आहे.