मुंबई-या देशाच्या विकासात गांधी-नेहरू परिवाराचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. गांधी-नेहरू परिवाराने देशाच्या विकासासाठी योगदान देतांना मोठे त्याग केले आहे. आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यात देखील तीच भावना आहे. सोनिया-राहुल गांधी हे गरिबांसाठी सेवाभावीवृत्तीने काम करत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त गांधी कुटुंबीयांनी देशाचा नाश केला असा ढोल बडवत आहे असे आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले आहे.
मोदींना गांधी परिवाराचा त्याग दिसत नाही असा टोलाही शरद पवार यांनी लगावला आहे. मोदींनी सोनिया-राहुल गांधी यांच्या कार्याचा आदर करावा असेही शरद पवार म्हणाले.