मोदींनी नोटबंदीचे फायदे सांगावे; राहुल गांधी यांचे आव्हान

0

मनसोर: मध्यप्रदेश येथे लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात होत असलेल्या मतदानाच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी मोदींवर हल्लाबोल केला. निरव मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी यांना मोदींनी कर्ज दिले असून, ते आरामात परदेशात राहत आहे. नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला झाला नसल्याचा आरोप त्यांनी केला.

नरेंद्र मोदींनी गेल्या ५ वर्षात किती युवकांना रोजगार दिला हे स्पष्ट करावे असे आव्हान त्यांनी केले. मोदींनी आंबे कसे खायचे हे शिकवले, पण नोटबंदीचे फायदे सांगितले नाही. मोदी यांनी सर्वसामान्य जनतेच्या खिशातून पैसे काढले आणि मेहुल चोक्सी, निरव मोदी यांच्या खात्यात टाकल्या असल्याचा
आरोप त्यांनी केला.

कॉंग्रेस पक्षाची ‘न्याय योजना’ असून त्यासाठी पैसा कुठून येईल? असे मोदी विचारतात, त्यांना माझे एकच म्हणणे असून ‘न्याय योजनेसाठी अनिल अंबानीच्या खिशातून पैसा काढून न्याय योजनेत टाकेल’.

मोदी सरकारने निरव मोदीला ३५ हजार कोटींचे कर्ज दिले. आम्ही ‘मन की बात’ करत नसून, मनाची गोष्ट समजतो, असे सांगितले. आम्ही मध्यप्रदेशच्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असून जे बोलतो तेच करतो. कॉंग्रेसच्या न्याय योजनेमुळे सगळ्यांना फायदा होणार असून कॉंग्रेसला बहुमत देण्याचे आवाहन त्यांनी केले.