सोलापूर-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहे. मोदींची सभा सुरु झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री यांनी मनोगत व्यक्त केले. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ३ वेळा सोलापुरात आले आहे. आजपर्यंत कोणताही पंतप्रधान तीनवेळा सोलापुरात आले नव्हते असे सांगत सोलापुराला प्रत्येक भेटीत मोदींनी भरभरून दिले आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
२४ तास पाणी पुरवढा
मोदींनी सोलापूरला पाणीपुरवठा व्हावे यासाठी चारशे कोटी रुपये दिले. त्यामुळे आता सोलापुरातील नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा होणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सांडपाणी प्रक्रिया होणार आहे. सांडपाणी एनटीपीसीला विकले जाणार आहे. हा पाणी पुन्हा वापरात येणार असून मोठ्या प्रमाणात सिंचन होणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.