मोदीजी 4 वर्षांत दलितांसाठी काय केले?

0

लखनऊ । भाजपच्या दलित खासदाराने सरकारला घरचा आहेर दिला आहे. उत्तरप्रदेशच्या नागिणा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे खासदार यशवंत सिंह यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. गेल्या चार वर्षात सरकारने देशातील 30 कोटी दलितांसाठी काहीच केले नसल्याचा आरोप सिंग यांनी पत्रातून केला आहे. देशभरात दलितांचा मोदी सरकारविरोधातील रोष वाढत असताना भाजप खासदारांचीही नाराजी वाढत चालली आहे. 2 एप्रिल रोजी लिहिलेल्या पत्रात त्यांनी न्याय पालिकेत दलितांचे प्रतिनिधित्व करणारे कोणी नसल्यामुळे आमच्याविरोधात नवे-नवे निर्णय येत असल्याचे म्हटले आहे.

‘भारत बंद’नंतर उत्तर प्रदेशात वाढले दलित अत्याचार
दलितांचे अधिकार संपवले जात असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांतील हे भाजपच्या दलित खासदाराने पंतप्रधानांना लिहिलेले हे तिसरे पत्र आहे. रॉबर्टसगंज येथील खासदार छोटेलाल खरवार, इटावाचे खासदार अशोक दोहरे यांनीही दलितांच्या मुद्द्यावरून मोदींना पत्र लिहिले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट कमकुवत झाल्याचा सांगत 2 एप्रिल रोजी देशभरात बंद पुकारण्यात आला होता, त्यानंतर राज्यात दलितांवर अत्याचार वाढल्याचे खासदारांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.