लखनौ: मोदी यांनी राजकीय लाभासाठी आपल्या पत्नीचा त्याग केला असून, ते दुसऱ्या माता-भगिनीचा आदर कसा करणार? अशी टीका बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी मोदींवर केली आहे. आज त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. भाजपातील नेत्यांच्या बायकांना मोदी त्यांच्या पतीपासून दूर करतील कि काय? अशी भीती वाटत आहे, आपल्या पतीचा मोदी यांच्यासोबत संपर्क येऊ नये असेही वाटत असल्याचे मायावती म्हणाल्या.
रविवारी मायावतींनी मोदींवर टीका केली होती. अलवर बलात्कारप्रकरणी मायावती आणि मोदी यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. अलवर येथील दलित महिलेवर बलात्कार प्रकरणी मोदी यांनी एकही शब्द उच्चारला नव्हता, मी बोलल्यानंतर मोदींनी प्रतिक्रिया दिली. केवळ राजकीय फायद्यासाठी त्यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपच्या राज्यात दलितांवर जो अन्याय झाला त्या प्रकरणावरून मोदी यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीकडून कधी राजीनामा मागितला नाही, रोहित वेमुला प्रकरणी केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घेतला नसून अलवर प्रकरणावरून त्यांना बोलण्याचा अधिकार नसल्याचा घणाघात आरोप केला.