खरगोण: आज १७ व्या लोकसभेच्या अंतिम टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील खरगोण येथे प्रचारसभा घेतली, यावेळी त्यांनी कॉंग्रेससह विरोधी पक्षावर निशाणा साधला. यावेळी बोलतांना मोदींनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ‘फिर एकबार मोदी सरकार’ असा नारा लगावला जात असल्याचे सांगितले. ‘अबकी बार ३०० पार’ चा नाराही मोदींनी यावेळी लगावला.
आज लोकसभा निवडणुकीचा प्रचार संध्याकाळपासून बंद होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारावरून राजकारण तापले आहे.