नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसाच्या चीन दौऱ्यावर रवाना झाले आहेत. चीनमध्ये ते शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनाइजेशन’च्या(एससीओ)शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. या शिखर परिषदेमध्ये सहकार्य, वाणिज्य, सीमाशुल्क, कायदा, आरोग्य आणि कृषी क्षेत्रात सहकार्य वाढविण्याच्या मुद्याबरोबरच दहशतवाद, नक्षलवाद आणि अतिरेकी कारवायांविरोधात सहकार्य करणे यासारख्या प्रमुख मुद्ययांवर चर्चा होणार आहे. तसेच पर्यावरणाचे रक्षण आणि नैसर्गिक आपत्तीच्या निवारणाचेही काही मुद्दे या परिषेद चर्चिले जाणार आहेत.
या परिषदेदरम्यान मोदींची परिषदेतील इतर सदस्य देशांच्या प्रमुखांशी बैठक आयोजित करण्यात आली आहे. एससीओ या संघटनेवर चीनचे वर्चस्व आहे. भारत गेल्यावर्षी या संघटनेचा पूर्णवेळ सदस्य बनला आहे. आता भारताला या परिषदेत आपली भूमिका मांडण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान, ते चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे.