बंगळुरु : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवलिंगावर बसलेल्या विंचवासारखे आहेत, असा उल्लेख त्यांनी केला आहे.
बंगळुरात लिट फेस्टमध्ये शशी थरुर यांनी भाग घेतला होता. यावेळी या त्यांच्या पुस्तकातील काही पानांचे त्यांनी वाचन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवलिंगावर बसलेल्या विंचवासारखे आहेत. त्याला तुम्ही हाताने हटवू शकत नाही आणि चप्पलने मारु पण शकत नाही असे वक्तव्य थरूर यांनी केले.
याआधी देखील थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतांना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. थिरूवनंतपुरममध्ये आयोजित ‘नफरत के खिलाफ : वर्तमान भारत में हिंसा और असहनशीलता’ कार्यक्रमात शशी थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावेळी शशी थरूर यांनी म्हटले होते की, नरेंद्र मोदी यांना वेग वेगळे कपडे धारण करताना बघितले आहे, पण ते कधीही मुस्लीम टोपी घालत नाहीत असे वक्तव्य केले होते.