कोलकत्ता : औषधाला एक मुदत असते. तशीच मोदी सरकारची मुदत संपत आली असून मोदी सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आहे, अशी गर्जना ममता बॅनर्जी यांनी केली. मोदी सरकारविरोधात एकत्र आलेल्या विरोधकांची कोलकत्यात विराट सभा झाली. तृणमूल काँग्रेसने आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या संयुक्त सभेत प्रमुख विरोधी नेत्यांसह माजी पंतप्रधान, तीन मुख्यमंत्री, तीन माजी मुख्यमंत्र्यांसह भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हाही सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनीच मोदी सरकारवर निशाना साधला.
तीन राज्यात भाजपच्या झालेल्या पराभवावर ममता म्हणाल्या, मोदी सरकारच्या काळात जनतेला अच्छे दिन आलेले नाहीत. त्यामुळे एक एक करून भाजपला सर्व राज्यातून हद्दपार करायचे आहे. भाजपला घरी बसवण्याचा निर्धार देशातील जनतेने केला आहे. तसेच रथयात्रेच्या नावाखाली राज्यात दंगली घालू देणार नाही, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी यावेळी दिला.
West Bengal CM Mamata Banerjee at Opposition rally in Kolkata: Modi govt is past its expiry date and in the coming days, a new dawn will descend. We will work together and it's a promise. pic.twitter.com/ItO9bcpe0Q
— ANI (@ANI) January 19, 2019
सीबीआय, ईडी सारख्या संस्थाविषयी आपल्या मनात आदर आहे. पण या सरकारने त्या कशा उद्ध्वस्त केल्या हे मी ऐकल आहे. पण, देशात नवी पहाट आणण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे काम कराव लागेल. मोदी बाबूची एक्सपायरी डेट संपत आली आहे, असा सूचक इशाराही ममतानीं दिला. आता जर मतदारांनी भाजपला मतदान केलं, तर त्यांना बँकेतील त्यांचे पैसे सुद्धा परत मिळाणार नाही, असेही ममता यावेळी म्हणाल्या. कोलकत्यात भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी आज सर्व विरोधी पक्षनेते एकत्र आले आहेत.अनेक दिग्गज नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते.