मोदी हे दुर्योधनापेक्षाही जल्लाद: राबडी देवी

0

पाटणा: जसजशे लोकसभा निवडणुकीचे टप्पे समाप्त होत आहे, तसतसे राजकीय वातावरण अधिक तापत आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना दिसत आहे. एकीकडे नरेंद्र मोदी तर दुसरीकडे अनेक पक्षाचे नेते यांच्यात वाकयुध्द सुरु आहे. या युद्धात आता राबडी देवी यांनी उडी घेतली असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जल्लाद म्हटले आहे. ‘प्रियंका गांधी यांनी कालच्या सभेत नरेंद्र मोदींचा उल्लेख दुर्योधन असा केला होता, प्रियंका गांधीनी मोदींना दुर्योधनापेक्षा दुसरा शब्द वापरायला हवा होता. हे सगळे जल्लाद आहेत, जे न्यायाधीशांची हत्या करतात, त्यांचे अपहरण केल जाते. अशा व्यक्तीचे विचार किती क्रूर असतील’ असे त्यांनी म्हटले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून अमित शहा यांनी कोलकात्याच्या सभेत प्रियंका गांधींना लक्ष्य केले होते.

राबडी देवीनी केले बलात्कारी आमदाराचे समर्थन
राजद चे माजी आमदार राजवल्लभ यादव यांच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असून, ते सद्ध्या तुरुंगात आहे. त्यांना या सरकारने बलात्कारच्या आरोपात फसवले असून, हे सरकर यादवांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राबडी देवी यांनी केला. नवादा येथील लोकसभेसाठी राजवल्लभ यादव यांच्या पत्नी विभा देवी यांना तिकीट देण्यात आले आहे, त्यावेळी राबडी देवी यांनी त्यांच्या प्रचारा वेळी राजवल्लभ कसे निर्दोष आहे, आणि त्यांना सरकारने कसे फसवले हे सांगितले होते. राजदचे आमदार राजवल्लभ यांना न्यायालयाने दोषी ठरवले असताना राबडी देवी यांनी त्यांचे समर्थन केले