मोफत नेत्रतपासणी शिबिर

0

पिंपरी : मातोश्री हॉस्पिटल तर्फे एक दिवसीय मोफत रक्तदान व डोळे तपासणी शिबिर आयोजित केले. यावेळी शिबिराचे उदघाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाले. यावेळी हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. प्रमोद नारायण वर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या रुग्णसेवेच्या आठवणींन उजाळा देण्यात आला.

शिबिरात 200 रुग्णांची मोफत डोळे तपासणी करण्यात आली. तसेच110 जणांनी रक्तदान केले. यावेळी नगरसेविका माया बारणे, हिरामण बारणे, सचिन भोसले, बाळासाहेब वाघमोडे, वसंत शेटे, संतोष बारणे, दिलीप तनपुरे, श्रीनिवास बढे, मुरली ढगे, उल्हास कोकणे, माऊली घोगरे तसेच डॉ. सुशील थोरवे, गणेश जाधव, डॉ. मीनाक्षी वर्मा, डॉ. अशोक लांडगे, सुधीर लांबखडे, पी.वाळुंज, प्रविणाआव्हाड आदी उपस्थित होते.