मोबाईलमधील फोटो व्हायरलची धमकी देत तरुणीचा विनयभंग : आरोपीला अटक

Kurhepanache Molested Village Girl : Accused Youth Arrested भुसावळ : तालुक्यातील कुर्‍हेपानाचे गावातील 18 वर्षीय युवतीचा ती अल्पवयीन असताना व सुमारे सहा महिन्यांपासून ते 4 सप्टेंबर रोजी रात्री पावणेदोन वाजता आरोपी सचिन ज्ञानेश्वर उर्फ नाना पाटील (कुर्‍हेपानाचे) या तरुणाने विनयभंग केला. या प्रकरणी पीडीत तरुणीने तालुका पोलिसात धाव घेत तक्रार दिल्याने आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

मध्यरात्री विनयभंग केल्याचा आरोप
18 वर्षीय युवतीच्या तक्रारीनुसार, सहा महिन्यांपूर्वी तसेच पिडीता अल्पवयीन असताना विनयभंग केला होता शिवाय 4 रोजी रात्री पावणेदोन वाजता तरुणीवर प्रेम असल्याचे सांगत तिचा विनयभंग केला तसेच माझ्याशी लग्न कर अन्यथा मोबाईलमध्ये काढलेला फोटो व्हायरल करेल, तुझ्या आई-वडिलांना 70 हजार रुपये दिल्याची बदनामी करेल, अशी धमकीही दिली. याबाबत पीडीतेने तक्रार दिल्याने आरोपीला अटक करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.