शिरपूर। शहरातील क्रांतीनगर भागात एका युवकाचा फोटो मोबाईलमध्ये काढल्याचा राग येवून मारहाण झाल्याची घटना दि.2 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान भांडण सोडवण्यासाठी काही महिला पुढे आल्या असता त्यांनादेखील मारहाण केली. याप्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
क्रांतीनगरातील चौकात एम.एल.पाटील यांच्या घराच्या ओट्यावर समाधान उर्फ मनोज राजपूत हा बसला होता. यावेळी भुलेश्वर निकम हा चारचाकी गाडी घेवून त्याठिकाणी येवून समाधानचा फोटो मोबाईलमध्ये काढला. याचा राग येवून दोघांमध्ये शाब्दीक चकमक उडाली. त्यांनतर दोंघामध्ये जबर मारहाण झाली. भांडण सोडवण्यासाठी कॉलनीतल महिला धावल्या. त्यावेळी भुलेश्वर याने आपल्या सात साथीदारांसह महिलांवर आक्रमण करत मारहाण केली. याप्रकरणी कविता राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ.नितीन निकम,भुलेश्वर निकम यांच्यासह सात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉक्टरांचा डोळा फोडला
शाब्दीक वादाचे रूपांतर भांडणात झाल्यावर भुलेश्वर याचा भाऊ डॉ.नितीन निकम हे इतर पाच सहा व्यक्तींसह येवून महिलांना मारहाण करू लागले यावेळी मारहाणीत डॉक्टरांचा डोळा फुटला. त्यामुळे नितीन निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून समाधान राजपूत याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.