मोबाईल चोरटा जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Bhalod youth arrested while selling stolen mobile phone यावल : चोरीचा मोबाईल विक्री करताना भालोदच्या तरुणाला अटक यावल पोलिसांनी अटक केली आहे. रोहित उर्फ बुवा मधुकर लोखंडे (19) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. यावल तालुक्यातील अट्रावल शेतशिवारातून एका शेतकर्‍याकडून गेल्या महिन्यात अज्ञात भामट्यांनी मोबाईल हिसकावून पळ काढल्यानंतर दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना या गुन्ह्यातील मोबाईल संशयीत विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली.

शेतकर्‍याकडून लांबवला होता मोबाईल
अट्रावल, ता.यावल येथील शेतकरी सुनील निवृत्ती चौधरी हे आपल्या सांगवी खुर्द शेत गट क्रमांक 122 मध्ये काम करत असतांना त्यांना दोन भामट्यांनी धाक दाखवत त्यांच्या खिशातील मोबाईल हिसकावला होता. गुन्हे शाखेचे फौजदार युनूस शेख इब्राहिम, हवालदार दीपक पाटील, पोलीस नाईक नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील, भारत पाटील यांनी गोपनीय माहितीच्य आधारे संशयीत बुवा लोखंडे याच्या मुसक्या आवळल्या.