जळगाव । गोलाणी मार्केटमधील रिध्दी-सिध्दी दुकानातून अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरून नेला होता. याप्रकरणी शहर पोलिसांना एकाला खेडी येथून अटक केली आहे. त्यास रविवारी न्यायालयात हजर केले असता 28 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सिंधी कॉलनी येथील अमित अशोक तुलसानी यांच्या रिध्दी-सिध्दी दुकानातून 25 नोव्हेंबरला दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने सात हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला होता.
दोन मोबाईल हस्तगत
याप्रकरणी तुलसानी यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, मोबाईल चोरट्याबाबत माहिती मिळाली असता शहर पोलिसांनी खेडी येथील पाटील वाडा गाठत संशयित चोरटा सौरभ नंदकिशोर गावंडे (वय-19) याला अटक केली आहे. पोलिसांनी सौरभ याची कसून चौकशी केली असता त्याने पोलिसांना सहा हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल काढून दिले असून ते जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, आज रविवारी न्यायाधीश व्ही.एच.खेळकर यांच्या न्यायालयात गावंडे यास हजर करण्यात येवून त्याची 28 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यातच गावंडे याच्याकडून आणखी काही मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड. निखील कुळकर्णी यांनी कामकाज पाहिले.