जळगाव – मोबाईल व पैसे लांबविणार्या फरार आरोपीला कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान आज शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून उर्वरित तीन संशयितांचा पोलिस शोध घेत आहे.
गेंदालाल मिल रोडवर तरुणाला मारहाण करून त्यांचा मोबाईल व त्याच्या खिश्यातील २ हजार ५०० रुपये लांबवून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात गेल्या ४ महिन्यापासून फरार असलेल्या संशयित आरोपी गुफरान शेख करीम रा. गेंदालाल मिल याला कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष रोही,अक्रम शेख, सुधीर साळवे, संजय हिवरकर, इमरान सैय्यद, गणेश शिरसाळे, संजय साळवे, बशीर तडवी, दिपक सोनवणे, प्रणेश ठाकूर यांनी अटक केली असून त्यांने गुन्ह्याची कबुली दिली आहे. दरम्यान उर्वरित तीन संशयितांचा पोलिस शोध घेत असून गुफरान याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.