आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळ– मोबाईल चोरीच्या प्रयत्न सतर्क नागरीकांच्या मदतीने टळल्यानंतर आरोपीस जमावाने चांगलाच चोप देत बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. 11 रोजी सायंकाळी सहा वाजता जयश्री स्वीटजवळ ही घटना घडली. आबीद शहा शकील शहा (21, रा.गौसिया नगर, भुसावळ) या आरोपीस बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. तक्रारदार गोपीचंद मोटुमल मनवाणी (64, सिंधी कॉलनी, भुसावळ) यांच्या खिशातील 11 हजार रुपये किंमतीचा मोबाईल आरोपी बळजबरीने लांबवत असताना मनमाणी यांनी त्यास प्रतिकार करीत आरडा-ओरड केल्यानंतर जमाव जमल्याने आरोपीस चांगलाच पब्लिक मार बसला. बाजारपेठ पोलिसांना घटना कळवल्यानंतर उमाकांत पाटील व तेजस पारीसकर यांनी आरोपीस अटक केली. तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल व पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहेत.