कृऊबा शेजारील सुरेशदादा जैन कॉम्प्लेक्समधील घटना ;रुमाल बांधलेले तीघे चोरटे सीसीटीव्हीत कैद
जळगाव ;– बाजार समितीच्या बाजूला असलेल्या सुरेशदादा जैन कॉम्लेक्समधील दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी रोख व मोबाईल असा एकूण 1 लाख 36 हजाराचा ऐवज लुटून नेल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून तीन जण तोंडाला रुमाल बांधलेले चोरी करतांना कैद झाले आहे.
जगवाणी नगर परिसरातील कमलेश घ्यार वय 25 यांचे सुरेशदादा जैन कॉम्लेक्स येथे कन्हैय्या मोबाईल नावाने दुकान आहे. यात ते स्टेटबँक आणि एअरटेल पेमेंट बॅँकेचे ग्राहक सेवा केंद्र चालवीत आहे. 1 जुलै रोजी कमलेश घार यांच्या मेहुण्यांनीसकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास दुकान उघडले. दिवसभरात जमा झालेले पैसे घेऊन जाऊ अशी विचारणा केली असता दुकानातील काउंटरला पैसे ठेवण्याचे सांगितले. यानंतर शशीकांत पाटील हे घरी निघून गेले . 2 जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शालक निलेश पुष्कर याने फोनद्वारे दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले असल्याचे सांगितले.
1 लाख 22 हजाराची रोकड लांबविली
कमलेश घार यांनी माहिती मिळताच सीसीटीव्ही फुटेज बघितले असता 2 रोजीच्या पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास 3 इसम तोंडाला रुमाल बांधून दुकानाचे शटर उचकावुन आत प्रवेश करून आतील 1 लाख 22 हजार 500 रुपये रोख , मोबाईल्स एकूण 1 लाख 36 हजारांचे चोरटयांनी चोरून नेले. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.