कल्याण : कळवा मनीषा नगर परिसरात राहणारा सुशांत गौडा हा इसमा कल्याण पुर्वेकडील चक्की नाका परिसरात राहणाऱ्या सदर पीडित महिलेला गेल्या दोन महिन्यांपासून तिच्या मोबाईल वर अश्लील मेसेज पाठवत होता.
वारंवार समज देऊन ही त्याने मेसेज पाठवणे सुरूच ठेवल्याने अखेर त्रस्त झाल्याने या महिलेने कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी सुशांत गौड विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .