जळगाव – रस्त्यावरून जाणा-या वक्तीच्या अज्ञात चोरट्यांनी मागून येवून हातातील मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना मंगळवारी रात्री उशीरा 11.30 घडल्याने अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, वसीम अख्तर जामील (वय-26) रा. आशियाना बिल्डींग, शाहूनगर हे रस्त्याने रिंगरोड वरील हॉटेल सायली समोरून रात्री 11.30 वाजता मोबाईलवर बोलत असतांना पायी जात होते. याचवेळी मागून येणा-या दोन मोटारसायकलवरून येवून हातातील ओप्पो कंपनीचा मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना घडली. वसीम जामील यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.