सांगवी : मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिंपरी-चिंचवड शहरतर्फे चिंचवडगावातील श्री मोरया गोसावी गणपती मंदिर आणि पवना नदी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी गणपती मंदिर, आसपासचा परिसर व नदी परिसरातून सुमारे एक टन कचरा गोळा केला.
यांची होता सहभाग
या अभियानात कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी नगरसेवक अॅड. मोरेश्वर शेंडगे, नामदेव ढाके, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेविका करुणाताई चिंचवडे, मराठवाडा जनविकास संघ चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समितीचे अध्यक्ष अरुण पवार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गोपाळ माळेकर, पिंपरी चिंचवड शहर व्यापारी आघाडीचे अध्यक्ष रवींद्र चिंचवडे, श्री मोरया गोसावी गणपती मंदिर देवस्थानचे विश्वस्त रमेश रबडे, दीपक जाधव, शिवाजी मानमोडे, संदीप बिरादार, रुपेश बिरादार, किरण घोगरे, विठ्ठल सोनार, अभिजित भालशंकर, दीपक वाल्हेकर आदी उपस्थित होते.
गोपाळ माळेकर म्हणाले, ट्रस्टतर्फे विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले जात असून, चिंचवडगावात श्री. मोरया गोसावी गणपती मंदिर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला असून, या उपक्रमात नागरिकांचे विशेष सहकार्य मिळाले. बिभिषण चौधरी म्हणाले, या अभिनव उपक्रमात प्रत्येक महिन्यातील पहिला रविवार स्वच्छता अभियानाचा हा संकल्प चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आपला कचरा दुसर्याच्या दारात टाकू नये, कचर्याची विल्हेवाट स्वत:च लावावी.