अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या पुढाकाराने
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्र. 10 मोरवाडी येथील श्रद्धा गार्डन ते जेकुमा टूल्स अँड गेजेसपर्यत नवीन रस्त्याला कै. उमेश जोगळेकर यांचे नाव देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या पुढाकारातून प्रभाग समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अ प्रभागाच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग समितीची पहिली बैठक मंगळवारी (दि.8) पार पडली. या बैठकीत दोन नामकरणाच्या महत्त्वपूर्ण ठरावांना मंजुरी देण्यात आली. मोरवाडी येथील श्रद्धा गार्डन ते जेकुमा टूल्स अँड गेजेसपर्यत नवीन रस्त्याला कै. उमेश जोगळेकर यांचे नाव देण्याचा ठराव अनुराधा गोरखे यांनी मांडला. त्याला एकमताने मंजुरी देण्यता आली. जोगळेकर यांचे फिटनेसविषयीचे कार्य प्रसिध्द असून जिम प्रशिक्षक म्हणून त्यांनी शहरात योगदान दिले होते. ते शहरातील ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांचे सख्खे म्हेवणे होते.
त्याबरोबर जेकुमा टूल्स अँड गेजेस व उमा प्लास्टिक या मोरवाडीतील कँपनी समोरील चौकाला उद्योजक कै. बळवंत जेजुरीकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. कै. जेजुरीकर हे पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध उद्योजक होते. त्यांना महापालिकेचा उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार मिळाला होता. ते जेकुमा कंपनीचे संस्थापक होते. नगरसेवक केशव घोळवे यांनी या प्रस्तावाची सूचना मांडली. तर, नगरसेवक तुषार हिंगे यांनी त्याला अनुमोदन दिले.