मोरवाडी रस्त्याचे नामकरण

0

पिंपरी : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील मोरवाडी येथील श्रद्धा गार्डन ते जेकुमा टूल्स अँड गेजेस रस्त्याचे ’कै. उमेश जोगळेकर पथ’ असे, तर उमा प्लास्टिक कँपनी समोरील चौकाचे उद्योजक कै. बळवंत जेजुरीकर चौक असे नामकरण करण्यात आले. या नामफलकांचे अनावरण रविवारी (दि.10) अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी भाजपचे जेष्ठ नेते आझम पानसरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, नगरसेवक केशव घोळवे, शैलेश मोरे, बाबू नायर, माजी नगरसेवक राजेश पिल्ले, नोव्हेल ग्रूप ऑफ इंस्टीट्यटचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे, सुनील कदम, राजू सावंत सौ. पानसरे, निहाल पानसरे,अण्णा लुकर, अमित गोरखे, महापालिकेचे अधिकारी शेखर साळवी, दीपक भोजने आदी उपस्थित होते.