राष्ट्रवादी पक्षाचे प्रदीप गायकवाड यांची मागणी
पिंपरी : काळेवाडी ते देहू येथे जोडल्या जाणार्या बी.आर.टी. मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. मोरवाडी येथील सायन्सपार्क चौकातून आयुक्त बंगल्याच्या दरम्यानचे काम बाधित ठरणार्या कंपन्यांच्या बांधकामामुळे अर्धवट स्वरूपात रखडलेले आहे. या मार्गावरील बाधित कंपन्यांचे स्थलांतर करून याबाबतीत योग्य तो निर्णय घेऊन हा मार्ग मोकळा करावा. तरी हा मार्ग अनेक दिवसांपासून छोट्या कारणांमुळे अडकून पडलेला आहे. याबाबतीत योग्य निर्णय होत नसेल तर त्या चौकात फ्लाय ओवर ब्रिज करून हा मार्ग मोकळा करावा. तरी या या मार्गाच्या कामासंदर्भात पुढाकार घेतल्यास पुढील काम करण्यास वेळ लागणार नाही. या मार्गाचे काम पूर्ण झाल्यास औद्योगिक परिसरातील वाहतुकीसाठी कामगारांच्या व नागरिकांच्या सोईचे ठरणार आहे.