मोरवाडी स्मशानभूमीच्या समस्या सोडवाव्यात

0

पिंपरी : मोरवाडी येथिल आनंदधाम स्मशानभुमीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. विविध अडचणींमुळे तेथे अंत्यविधीसाठी येणार्‍या नागरीकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्मशानभुमीच्या विविध समस्या सोडविण्यात याव्यात. याबाबत आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन दिले आहे. दर महिन्याला सरासरी चाळीस ते पन्नासच्या आसपास या स्मशानभुमीमध्ये अंत्यविधी केले जातात. तेथे उदभवणार्‍या विविध समस्यांमुळे नागरीकांची गैरसोय होत आहे. दररोज किमान 2 ते 3 शवांचा अंत्यविधी स्मशानभूमित करण्यात येतो. त्या स्मशानभुमीचे पत्र्याचे शेड खराब झाले असून ते बदलणे गरजेचे आहे. अंत्यविधी करीत असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुर होतो.

धुरामुळे तेथे येणार्‍या नागरीकांना, रहिवाश्यांना, लहान मुलांना त्याचा त्रास होत आहे. येथे नविन धुराडे बसविण्यात याव्यात. स्मशानभुमीच्या येथे असणार्‍या शौचालयाचे ड्रेनेज वारंवार तुंबते. शौचालयामध्ये विद्युत दिवे बसविण्यात यावेत. पाण्यासाठी असणारी टाकी अत्यंत लहान स्वरूपाची आहे. त्यामुळे पाणी पुरत नाही. जास्त क्षमतेची पाण्याची टाकी बसविण्यात यावी. स्मशानभूमिमध्ये असणार्‍या दफनभुमीत गवत वाढले असून तेथे सापांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. येथील कर्मचार्‍यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागते आहे. गवताची छाटणी करण्यात यावी. एका मोठ्या चौकोणी खड्ड्यामध्ये चिता रचली जाते. हे खड्डे बुजवून लोखंडी साचे बसविण्यात यावेत. प्रवेशद्वारावर स्मशानभुमिचा नियमावलींचा मोठा फलक लावावा.