मोरसिंग राठोड यांना ‘बंजारा समाजरत्न’ पुरस्कार

0

जळगाव-भडगाव तालुक्यातील वडगाव नालबंदी येथील माजी सरपंच मोरसिंग दल्लू राठोड यांना अखिल भारतीय बंजारा युवा सेनेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘बंजारा समाजरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ठाणे येथे २ सप्टेंबर रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. अखिल भारतीय बंजारा युवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जिनकर राठोड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

मोरसिंग राठोड हे बंजारा समाजातील संस्कृती व परंपरा कायम टिकून राहाव्यात यासाठी समाजात जनजागृतीचे कार्य करतात. ‘गोरबोध’ ही त्यांची सामाजिक संस्था असून या संस्थेमार्फेत ते बंजारा समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांना तसेच अंधश्रद्धांना आळा घालण्यासाठी जनजागृती कार्य ते करीत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना बंजारा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘बंजारा समाजरत्न’ पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आल्याने ग्रामस्थ व समाजबांधवांतर्फे त्यांचे अभिनंदन केले जात आहे.