तळेगाव दाभाडे : मोलमजुरी करून पोटाचा उदरनिर्वाह करणार्या कुटुंबातील लहानग्या मुलीचा पाण्याच्या खड्यात पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात दुःख व हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत मयत झालेल्या मुलीचे नाव तनिशा नारायण निषाद असून ती 3 वर्षांची होती. या मुलीचे आई वडील क्लासिक बिल्डींग या बांधकाम साईडवर मजुरीचे काम करत होते. सोमवारी ते नेहमी प्रमाणे काम करत होते. त्यांच्या बरोबर त्यांची मुलगी तनिशा देखील होती. ते दिलेले काम करत होते. या बांधकामावर कामावर लिप्टचे नियोजन करण्यात आले आहे. त्या लिप्टसाठी खड्डा खोदला होता. बांधकामाच्या साईडवर पाणी मारत असल्याने त्या खोदलेल्या खड्यामध्ये पाणी साठले होते. तनिशा खेळता खेळता त्या खड्यामध्ये केव्हा पडली हे कोणाच्या लक्षात आले नाही. त्यामध्ये ती बुडाली.
हे देखील वाचा
लिप्टसाठी खोदलेल्या खड्यात पडली
सुमारे पाचच्या सुमारास काम कारणार्या आई-वडिलांना आपली मुलगी खेळताना दिसली नाही. त्यावेळी त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लिप्टसाठी खोदलेल्या खड्यात ती आढळून आली. तिला जवळच्या दवाखान्यात नेले असता ती उपचारापूर्वीच मृत्यू झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी मजुरी कारणार्या आई-वडिलांनी काम करताना आपल्या मुलांकडे लक्ष दिले पाहिजे, काही कारणाने खोदलेल्या खड्यांमध्ये पाणी साचणार नाही, किंवा त्यामध्ये कोणी पडणार नाही याची काळजी संबंधीतांनी घेणे गरजेचे आहे, अशी हलक्या आवाजात नागरिकांकडून चर्चा सुरु होती. या घटनेचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.