पिंपरी – या आठवड्यात मोशीतील नागेश्वर महाराज उपबाजारातील फळभाज्या व पालेभाज्यांची आवक वाढली आहे. मात्र, एकूण आवक घटली आहे. तर पालेभाज्यांची आवक किरकोळ वाढली असून, भाव मात्र तेजीत आहेत. या आठवड्यात कांदा, भेंडी, मिरचीची आवक वाढली आहे. तर बटाटा, लसूण आणि कैरीची आवक मात्र घटली आहे. उन्हाळ्यामुळे कैरी व काकडीला मागणी वाढली आहे. आल्याची आवक घटल्याने क्विंटलमागे 1800 रुपयांची विक्रमी वाढ झाली.
फळभाज्यांची एकूण आवक 775 क्विंटल झाली असून, पालेभाज्यांची आवक 20 हजार 841 गड्डया एवढी झाली आहे. फळभाज्यांची आवक 115 क्विंटलने घटली आहे, तर पालेभाज्यांची आवक एक हजार 236 गड्ड्यांनी वाढली. कांद्याची 170 क्विंटल आवक झाली असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत 133 क्विंटलची वाढ झाली असुन, सरासरी भावात 100 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. बटाट्याची 53 क्विंटल आवक झाली असून, आठ क्विंटलने घट झाली असून, भावदेखील 150 रुपयांनी वधारले. भेंडीची आवक 13 क्विंटलने वाढुन भावात 500 रुपयांची घट झाली. गवारीची आवक आठ क्विंटलने घटून, भाव 750 रुपयांनी घटले. तसेच टोमॅटोची आवक सहा क्विंटलने वाढली असून, भाव मात्र 150 रुपयांनी घटले. मटारची आवक स्थिर राहून बावात 500 रुपयांची वाढ झाली. घेवड्याची आवक एक क्विंटलने घटून भाव 500 रुपयांनी वधारले. दोडक्याची आवक सात क्विंटलने घटून, भाव 500 रुपयांनी वधारले. लसणाची आवक तीन क्विंटलने घटून भाव मात्र स्थिर राहिले. तसेच आल्याची आवक दोन क्विंटलने वाढून, भाव 1800 रुपयांनी वधारला.
मिरचीची आवक 19 क्विंटलने वाढून भाव मात्र स्थिर राहिले. दुधी भोपळ्याची आवक तीन क्विंटलने वाढुन भाव 100 रुपयांची घट झाली. कारल्याची आवक पाच क्विंटलने घटून, भाव 150 रुपयांनी वधारले. गाजराची आवक दोन क्विंटलने वाढून भाव मात्र 1000 रुपयंनी घटले. फ्लॉवरची आवक एक क्विंटलने घटून भावात किरकोळ 50 रुपयांची घट झाली. कोबीची आवक तीन क्विंटलने वाढून भाव मात्र स्थिर राहिले. वांग्यांची आवक आठ क्विंटलने वाढली असून, भाव देखील 400 रुपयांनी वधारले. लिंबांची आवक दोन क्विंटलने वाढून, भावात 1500 रुपयांची घट झाली.
वालवरची आवक दोन क्विंटलने घटून, भाव मात्र स्थिर राहिले. शेवग्याची आवक दोन क्विंटलने घटून भावात 800 रुपयांची वाढ झाली. ढोबळी मिरचीची आवक दोन क्विंटलने घटून, भाव मात्र स्थिर राहिले. बीटची आवक स्थिर राहुन,भावात 100 रुपयांची घट झाली. घोसावळ्याची आवक तीन क्विंटलने वाढून, भाव 500 रुपयांची वाढ झाली. कैरीची दोन क्विंटल आवक घटून, भाव 600 रुपयांनी घटले. तोंडल्याची चार क्विंटल आवक घटून, भाव 450 रुपयांनी वधारले.
पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीच्या आठ हजार 450 गड्ड्यांची आवक झाली. तर मेथीची चार हजार 830 गड्ड्या आवक झाली आहे. याशिवाय शेपूची 1410 गड्ड्या, मुळे 310 गड्ड्या, पुदीना 300 गड्ड्या, पालक तीन हजार 270 गड्ड्या, चवळीच्या 791 गडड्या, तर कांदापातीच्या एक हजार 18 गडड्यांची तर करडईच्या 150 गडड्या आवक झाली.