मोशी : येथील व्ही. एच. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये चित्रकला प्रदर्शन सुरू आहे. चित्रकार ॠतुजा हिंगणे, ऐश्वर्या कांबळे, सोनाली टट्टे, अंकिता तंबोली यांनी काढलेली व्यक्तिचित्रे, पोट्रेट, टू डी, पॉट पेटिंग अशी चित्रे आहेत. प्रदर्शनास नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाचे याचे उद्घाटन नगरसेवक सागर हिंगणे, वसंत बोराटे, स्विकृत सदस्य दिनेश यादव, नॅशनल कॉलेज ऑफ फाईन आर्टचे मुख्याध्यापक प्रभाकर असवले यांच्या हस्ते झाले.