मोशी नागेश्‍वर उपबाजारात टोमॅटो, वांग्याची आवक

0

चिंबळी : मोशीतील नागेश्‍वर महाराज उपबाजारात फळभाज्यांची एकूण आवक 862 क्विंटल झाली असून, पालेभाज्यांची आवक 32 हजार 590 गड्डया एवढी झाली आहे. फळभाज्यांची आवक 217 क्विंटलने तर पालेभाज्यांची आवक 21 हजार 791 गड्ड्यांनी आवक घटली. टोमॅटो आणि वांग्याची आवक वाढली. कांद्याची आवक 55 क्विंटल झाली असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत 27 क्विंटलची घट झाली असून, सरासरी भाव मात्र स्थिर राहिले. बटाट्याची आवक 128 क्विंटलने वाढून, भावात किरकोळ 100 रुपयांची वाढ झाली. भेंडीची आवक सहा क्विंटलने घटून भावात 50 रुपयांची किरकोळ वाढ झाली. गवारीची आवक सात क्विंटलने घटून, भाव 1250 रुपयांनी वधारले. तसेच टोमॅटोची आवक 64 क्विंटलने वाढली असून, भाव 50 रुपयाची घट झाली. मटारची आवक 31 क्विंटलने घटूनही भाव 500 रुपयांची घट झाली. किरकोळ बाजारात 40 रुपये प्रतिकिलो दराने मटारची विक्री होत आहे. घेवड्याची आवक आठ क्विंटलने घटली असून, भाव मात्र 1000 रुपयांनी घटले. दोडक्याची आवक पाच क्विंटलने घटून भाव 2000 रुपयांनी वधारला.

मिरचीचे दर स्थिर
मिरचीची आवक दोन क्विंटलने घटली असून, भाव मात्र स्थिर राहिले. दुधी भोपळ्याची आवक तीन क्विंटलने घटून भावात 450 रुपयांची वाढ झाली. काकडीची आवक सहा क्विंटलने वाढून भाव किरकोळ 500 रुपयांची वाढ झाली. कारल्याची आवक तीन क्विंटलने वाढली असून, भाव मात्र स्थिर राहिले. गाजराची आवक आठ क्विंटलने घटून भाव 650 रुपयांनी घटले. फ्लॉवरची एक क्िंवटल आवक वाढून, 900 रुपयांनी भाव वधारले. कोबीची आवक 29 क्विंटलने घटूनही भाव 150 रुपयांनी वधारले. वांग्यांची आवक आठ क्विंटलने घटली असून, भाव 750 रुपयांनी वधारले. लिंबांची आवक आठ क्विंटलने वाढली असून, भावात 100 रुपयांची वाढ झाली.

चवळी दर वाढले
वालवरची आवक दोन क्विंटलने घटून, भावात 250 रुपयांची वाढ झाली. चवळी, घोसावळी,शेवगा व पापडीची प्रत्येकी दोन क्विंटल आवक झाली. तर पावट्याची आवक एक क्विंटलने घटून भाव 250 रुपयांनी वधारले. ढोबळी मिरचीची आवक 21 क्विंटलने घटून, भाव 500 रुपयांनी वधारले. बीटची आवक चार क्विंटलने वाढून भाव 1250 रुपयांनी घटले. चवळीची एक क्विंटल आवक वाढून, भावात 750 रुपयांची वाढ झाली.

कोथिंबीर, मेथी, शेपू
पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीच्या 10 हजार 300 गड्ड्यांची आवक झाली. तर मेथीची 10 हजार 900 गड्ड्या आवक झाली आहे. याशिवाय शेपूची 1700 गड्ड्या, मुळे 1 हजार 70 गड्ड्या, पुदीना 1200 गड्ड्या, पालक 3280 गड्ड्या, करडईच्या 220 गड्ड्या, हरभर्‍याच्या 1230 गड्डया, तर कांदापातच्या 1690 गड्डयांची आवक झाली.