मोहननगर शाखाप्रमुखपदी सागर पुंडे

0

चिंचवड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्यावतीने विविध शाखांमध्ये, प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांची नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण शहरातील विविध कार्यकर्त्यांची नियुक्ती एकाचवेळी करण्यात आली. शिवसेनेच्या चिंचवड परिसातील मोहननगर शाखेच्या शाखाप्रमुखपदी सागर पुंडे व विजय सुर्वे यांची निवड करण्यात आली. सागर पुंडे यांनी यापूर्वी युवासेना विभागप्रमुखपदी काम केले आहे. अवघ्या 20 वर्षांचे असलेले पुंडे हे सर्वांत कमी वयाचे शाखाप्रमुख ठरले आहेत. पुंडे आणि सुर्वे यांनी सांगितले की, शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या संधीमुळे आम्हाला आनंदच झाला आहे. शिवसेनेने केलेले काम लोकांपर्यंत पोहोचविणार आहोत. तसेच पक्ष संघटनाठीही मदत करणार आहोत. पुंडे आणि सुर्वे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.