यावल : भरधाव ट्रॅक्टरने चारचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चारचाकी वाहनाचे नुकसान झाले. याबाबत यावल पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मोहराळा रस्त्यावर अपघात
मोमीन वसीम शेख सलीम (25, बाबा नगर, यावल) हा तरुण वाहन चालक असून रविवार, 24 जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तो आपले वाहन घेऊन मोहराळा-सावखेडा रस्त्यावरील जामुनझीरा चौकाजवळून जात असताना समोरून भरधाव वेगाने ट्रॅक्टर आणत असलेले चालक समाधान आनंदा पाटील (रा.दहिगाव) यांनी येऊन मोमीन शेख यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात वाहनाचे 10 हजारांचे नुकसान झाले. याबाबत मोमीन वसीम शेख यांनी यावल पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने समाधान पाटील (दहिगाव, ता.यावल) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास संजय देवरे करीत आहेत.