मोहराळेतील इसमाचा खून, 14 जणांविरुद्ध अखेर खुनाचा गुन्हा

0
यावल : तालुक्यातील मोहराळे येथील पिंटू अडकमोल (37) या इसमाचा खून प्रकरणी रात्री उशिरा यावल पोलिसात 14 आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संतप्त नातेवाईकांनी गुन्हा दाखल होईस्तोवर मृतदेह न हलवण्याची भूमिका घेतल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली होती.
रात्री उशिरा 14 आरोपींविरुद्ध खुनाचा कट रचने, खून करणे व अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास नातेवाईकांचा राग शांत झाला व त्यांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी हलवला.  पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी हे स्वतः आरोपींच्या अटकेसाठी बंदोबस्तासह रात्री मोहराळेत रवाना झाले.