जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू
जळगाव : व्यावसायीकाने खरेदी केलेला कापसाला वाहनात भरून आणण्यासाठी गेलेल्या छोटा हत्ती ( मिनीडोअर) वाहनाचा वळणावर वेग चालकाकडून नियंत्रित न झाल्याने हे वाहन पल्टी होऊन या अपघातात नऊ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी मोहाडी (जळगाव) नजिक घडली. माहिती मिळताच ग्रामस्थानी धाव घेऊन जखमीना प्रथम जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ हलविले.
रोटवद (जामनेर) येथील मजूर शेतकर्यांकडून खरेदी केलेला माल वाहनात भरून देतात. नेहमी प्रमाणे आज कापूस घेण्यासाठी वाहन करमाड येथे जाण्यासाठी सकाळी मजूरासह मार्गस्थ झाले. वळणावर वाहनास नियंत्रित आणणे चालकास शक्य न झाल्याने ते पल्टी झाले. या अपघातात एकूण नऊ जणांना दुखापत झाली. मोहाडीच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरू केले. तर रोटवद येथे वाहनास अपघात झाल्याचे कळताच स्थानिक लोकांनी सिव्हील गाठून जखमींची विचारपूुस केली.जखमीमध्ये संजय पिंताबर कोल्हे (30),सचिन पंडित बोकडे (30),कडूबा पाटील (50),शामा सुपडू मोरे (40), गणेश अशोक पोकळे (30),ईश्वर एकनाथ तिडके (38), संदिप पांडूरंग बोकडे (32),गोपाळ प्रकाश बोकडे(32), अशोक कडूबा पवार(36) यांचा समावेश सर्व जण रोटवद येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर तत्काळ
उपचार सुरू करण्यात आले. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून दोन जणाना जास्त मार लागला आहे.